Sunil Khardikar - Director

Sunil Khardikar - Director

१)खर्डीकर क्लासेस सुरु करण्याची संकल्पना  तुम्हाला कशी सुचली ?

आज अत्यंत गतिमान युगामध्ये आपल्या सर्वांच जीवन प्रवाह सुरु आहे. या युगाच्या पार्श्वभूमीच्या काळात आपल्या जीवनाची जडण-घडण सुरु आहे . याचीच दखल घेऊन १९९३ साली  "खर्डीकर क्लासेसची" स्थापना केली. विद्यार्थ्यांमध्ये विषयाची आवड निर्माण झाली तर तो आकलन सहजरीत्या करू शकतो.  आज शिकवणी वर्गांचे पेव फुटले आहे पण हे सर्व वर्ग गुणवत्ता वाल्यांसाठी !  त्यात प्रवेशही गुणवत्तेच्या निकषांवर! या बहुसंख्य गुणहिनांसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी घेण्याची कुणी तयारी दाखवित नाही.  त्यामुळे व्यावसायिक तत्वावर आधारीत असलेल्या पण सामाजिक कर्तव्य भावना मनी बाळगून खर्डीकर क्लासेसची यशस्वी वाटचाल सुरु केली.

२)क्लास सुरु करताना तुम्हांला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले ?

कोणतीही  नवीन सुरुवात करायची म्हटले की,आर्थिक तसेच सामाजिक अडचणींचा सामना करावाच लागतो. तसाच डोंबिवलीमधील सहा विदयार्थांच्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या सोबतींच्या प्रयत्नानेच मी हा प्रवास सुरु करून आज इथपर्यंत पोहोचलो. १९९३ हा काळ अधिक विकसित नसल्यामुळे तसेच अनेक आर्थिक अडचणींना मागे सारून माझ्या स्वप्नांची पूर्तता केली.  येणाऱ्या बदलत्या युगामधील बालकांच्या उमलू पाहणाऱ्या जीवनाला दिशा देण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये खारीचा वाटा उचलला.

 ३)सहा विद्यार्थ्यांपासून सुरु केलेला हा प्रवास आज हजारों  विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोहचला, या प्रवासाबद्दल तुम्ही  काय सांगाल?

१९९३ सालच्या काळात विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत. प्राथमिक शिक्षण घेणे देखील अवघड जात असे. त्यासाठी आम्ही  मुलांना 'खर्डीकर क्लास' हा मंच उभा करून दिला.  प्रथम गुणवत्ता असणाऱ्यांसाठी अनेक नवीन पर्याय उपलब्ध असतात परंतु जे ४०% ते ५० % किंवा त्याखालील गुण संपादन करतात त्यांच्यासाठी कोणतेच पर्याय उपलब्ध नसतात.  नंतर असे विद्यार्थी गुन्हेगारी,व्यसन ,पालकांसमोर गैरवर्तन,आत्महत्या अश्या गोष्टींच्या अधीन जातात.  त्यामुळे अशा मुलांना योग्य मार्गी */  लावण्याचे कार्य आम्ही सुरु केले. या प्रयत्यांतूनच पहिले बारा वर्षांत १०० ते २०० तसेच आज २७ वर्षांत क्लास हजारों विद्यार्थ्यांच्या ९० % ते ९५ % पर्यंत यश मिळाले आहे.

४)अभ्यासाव्यतिरिक्त  मुलांना कोणकोणत्या उपक्रमांमध्ये तुम्ही मार्गदर्शन करता?

शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच सहशैक्षाणिक उपक्रमांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी आमचे शिक्षकवृंद,आमचे क्रिडाप्रशिक्षक सदोदित कार्यरत असतात. याची प्रचिती म्हणजे उत्तम शैक्षणिक प्रगती बरोबरच विद्याथी विद्यार्थिनी जुडयो,कराटे,क्रिकेट,अ‍ॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारात तर संगीत,अभिनय,चित्रकला,वक्तृत्व,हस्ताक्षर,इंग्रजी,गणित प्राविण्य इं. क्षेत्रामध्ये जिल्हा आणि राज्यपातळीपर्यंत  मुलांना संधी देतो. त्यातूनच ते उत्तम करियर घडवतात.आमची मुलगी 'करिष्मा खर्डीकर' ने जसे बॅडमिंटन खेळाचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर रोवला. तेच स्वप्न आम्ही क्लासेसच्या इतर विद्यार्थ्यांसाठी देखील पाहिले आहे आणि ते आमचे विद्यार्थी पूर्ण करणारच हा आमचा विश्वास आहे.


५)बोर्डाच्या किंवा परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन करता?       

खर्डीकर क्लासेसमध्ये ज्ञानार्थी सर्वतोपरी लॅब,ग्रंथालय,क्रीडा,साहित्य,व्यवसाय,मार्गदर्शन,टेस्ट सिरीज,स्टडी रूम,इंग्लिश ग्रामरचे वर्ग,सायन्स प्रॅक्टिकल,सर्व प्रकारचे अध्ययन संपूर्ण अभ्यासक्रमाचे नियोजन. त्यांची काटेकोर अंमलबजावणी,इंग्रजी,गणित आणि विज्ञान या विषयांवर विशेष लक्ष,परीक्षेची भीती दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न,सर्व विषयांना सामान महत्त्व,वेळेचे व्यवस्थापन,एकाग्रता व स्मरणशक्ती वाढविण्यसाठी खास तंत्र इ. सुविधा विद्यार्थ्यांसाठी तत्पर सज्ज आहेत. या सर्व सुविधांच्या माध्यमातून राष्ट्राचे भावी सुजाण नागरिक साकार व्हावेत हा आमचा प्रांजळ मानस आहे

६)खर्डीकर क्लासेसच्या इतर शाखांबद्दल तुम्ही काय माहिती द्याल?

खर्डीकर क्लासेसच्या सर्वांत प्रथम पाय हा डोंबिवली(पूर्व) भागात रोवला गेला.  एका अविस्मरणीय प्रवासाला येथून सुरुवात झाली. त्यानंतर जसेजसे विद्यार्थी संख्या वेग धरू लागली त्याचप्रमाणे आमच्या शाखा वाढवण्याचा मानस देखील वेग धरू लागला. एका अंकुराचे जसे अवाढव्य वटवृक्ष उभा राहतो त्याचप्रमणे आमच्या खर्डीकर क्लासेसच्या वृक्ष देखील अवाढव्य शाखांमध्ये पसरला. म्हणूनच आज एका शाखेपासून अनेक शाखांमध्ये खर्डीकर क्लास विभाजित झाला.

७)खर्डीकर क्लासेसच्या वतीने तुम्ही कोणकोणते सामाजिक उपक्रम राबवले?

ज्ञानाची विश्वव्याप्ती लक्षात घेऊन खर्डीकर क्लासेसच्या व्यवस्थापनाने काही शैक्षणिक या सामाजिक उपक्रम केले आहेत. शाळा,इंग्रजी माध्यम शाळा आणि ज्यु. कॉलेज सुरु करणे,समाजातील अनाथ,निराधार स्त्रियांना स्वावलंबी बनविण्याच्या हेतूने विकास व निराधार केंद्र स्थापन करणे,आरोग्यसंकेत हा दिवाळी अंक काढणे,अनेक सामाजिक उपक्रम समाजासाठी आम्ही राबवत आसतो.

८)तुमच्या भविष्यातील योजना काय आहेत?

विद्यार्थ्यांचा संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकास व परीक्षेत यश हा योगायोगाचा भाग नसून खाजगी विद्यार्थ्यांचे परिश्रम व पालकांचे सहकार्य यावर अवलंबून असतो हे यशातील चार महत्त्वाचे घटक खर्डीकर परिवारात गुण्यागोविंदाने नांदत असल्यामुळे खर्डीकर क्लासेसची वाटचाल पुढे चालू आहे. परंतु महारष्ट्राएवढा आकाराचा लहानसा देश जपान,तेथे वयाच्या ५-६ वर्षापासूनच कला चाचणी घेतली जाते. मुलांना त्याच्या कौशल्यानुसार आपले करिअर निवडण्याची मुभा त्यांना मिळते.  उदा. एखाद्याला खेळात आपले करिअर करायचे असेल तर तो विद्यार्थी फक्त खेळावरच आपले लक्ष केंद्रित करतो.हीच बाब लक्षात घेऊन आम्ही देखील निसर्गरम्य वातावरणात १० वी,१२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात्मक शाळा,कॉलेज तसेच बाजूला स्विमिंग पूल,बॅडमिंटन कोर्ट,बनवण्याचे नियोजन केले आहे. जेणेकरून मुलांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच,खेळात देखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तुंग यश मिळवता येईल. जपानसारखा लहानसा देश कलाचाचणी घेऊन अनेक सुवर्णपदके मिळवतो. परंतु आपला १३५ करोड लोकसंख्या असलेल्या देशाला मात्र ३-४ सुवर्णपदकांवरच समाधान मानावे लागते. हीच स्थिती आता आपणां सर्वाना बदलायची आहे आणि खर्डीकर क्लासेसचा मोलाचा वाटा असेल,याची आम्ही खात्री बाळगतो.

९)तुमच्या विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा आहेत?

संचालक या नात्याने माझ्या उल्हासी सहकाऱ्यांकडून,विद्यार्थ्यांकडून माझ्या काही अपेक्षा आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या सहकाऱ्यांनी सतत उपक्रमशील राहावे असे मला वाटते.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी देखील प्रामाणिकपणा,कष्ट,जिद्द आणि आज्ञाधारकपणा या गुणांची जोपासना करीत स्वतःचा नैतिक विकास करून देण्यात गुरुजनांना प्रतिसाद दिला पाहिजे.  प्रत्येक चांगल्या कामाची सुरवात मीच करणार या ध्येयाने पेटून उठून माझ्या विद्यार्थ्यांनी एकनिकोप भविष्य जन्मास घालावे आणि सुंदर समाजाची निर्मिती करावी अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. दुसऱ्यांना दोष न देता स्वतःमधील दोष सुधारण्यासाठी शिक्षण असते. हे सूर्यप्रकाशासारखे सत्यवचन माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याने स्मरणात ठेवावे आणि स्वतः एक चांगला माणूस व्हावे. आमचे सर्व सहकारी प्राध्यपक,विद्यार्थी ,विद्यार्थिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी हे सर्वजण अपार कष्टातून माझी हि स्वप्ने पूर्ण करतील अशी माझी खात्री आहे.

Contact Us

Maps and Directions